Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीराजकीय

बामसेफ चे ३७ वे राष्ट्रीय अधिवेशन यंदा व्हर्चुअल पद्धतीने… सहभागी होण्याचे आवाहन

करमाळा-
बामसेफ या सामाजिक संघटनेचे ३७ वे राष्ट्रीय अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच व्हर्चुअल पध्दतीने होत आहे.२५ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी.बी.सावंत हे करणार असून मूलनिवासी बहुजन समाजाला भेडसावणाऱ्या विविध विषयांवर देश विदेशातील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.तरी या आॅनलाईन अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बामसेफ चे राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब बळी आणि तालुकाध्यक्ष दयानंद चौधरी यांनी केले आहे.
सोबतच भारत मुक्ती मोर्चा चे १० वे राष्ट्रीय अधिवेशन देखील व्हर्चुअल पद्धतीने २८ आणि २९ डिसेंबर रोजी होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत आणि स्वराज्य इंडिया या संघटनेचे प्रमुख प्रा.योगेंद्र यादव हे करणार आहेत.या दोन्ही अधिवेशनाची अध्यक्षता बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे करणार आहेत.भारत मुक्ती मोर्चाच्या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष हनुमंत विटकर आणि कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे,बहुजन क्रांती मोर्चा चे आर.आर.पाटील,किसान मोर्चाचे मधुकर मिसाळ-पाटील,राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे निरंजन चव्हाण व यांनी केले आहे.
error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group