Friday, January 10, 2025
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक श्री .गुरव सर यांनी करून स्त्रीशिक्षणाचे महत्व सांगितले .मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या की त्यांची प्रगती होती हे ओळखून मुलींच्या शिक्षणासाठी आग्रह धरून , सावित्रीमाईंच्या खांद्याला खांदा लावून प्रमुख भूमिका बजावल्याने आज मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत असे मुख्याध्यापक श्री . गजेंद्र गुरव यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले .विद्यार्थीनींनी आज यानिमित्ताने फातिमामाईंना अभिवादन करण्यासाठी एक शुभेच्छापत्र आवर्जून बनवले होते .
इयत्ता सातवीतील कु .मीरा विठ्ठल शिरगिरे या विद्यार्थीनीने फातिमामाईंसाठी एक सुंदरशी कविता सादर करून त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली .
धर्म,रुढी ,परंपरा यांची बंधने झुगारून , प्रचलित समाजव्यवस्थेच्या प्रवाहाविरोधात जावून स्त्रियांच्या विकासाचा मूळ पाया शिक्षणच आहे हे ओळखून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंना खऱ्या अर्थाने साथ देणाऱ्या, आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या आणि सावित्रीमाईंच्या शाळेत सहशिक्षिकेचं कर्तव्य अत्यंत तळमळीने बजावणाऱ्या, जोतिबांच्या खडतर काळात आपला वाडा उपलब्ध करून देणाऱ्या उस्मानभाई शेख यांच्या भगिनी आदरणीय, वंदनीय फातिमाबी शेख यांच्या कार्याविषयीची सविस्तर माहिती श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी (शेख) मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली व साऊ – फातिमाच्या कार्याचा वसा घेऊन आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घेण्याविषयीचे आवाहन केले .
यावेळी विद्यार्थीनींनी आपली मनोगते सादर करताना आम्ही आमचे शिक्षण अर्धवट न सोडता पूर्णतः स्वावलंबी बनून देशसेवा करु व भविष्यात देखील मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावून साऊ – फातिमामाईंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहू अशी प्रतिज्ञा केली .शेवटी सर्वांचे आभार श्रीम. शिरसकर मॅम, श्रीम.मिर्झा मॅम व श्री. लहू जाधव सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!