Uncategorized

करमाळा माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ सर यांनी त्यांच्या वाशिंबे गावी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

 . करमाळा प्रतिनिधी करमाळा माढा विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ सर यांनी आपल्या वाशिंबे गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्मपत्नी ‌ सौ. मायाताई झोळ मॅडम, चिरंजीव पृथ्वीराज झोळ यांनीही मतदानाचा अधिकार बजावला आहे. करमाळा तालुक्यात‌ रस्ते, पाणी, वीज याचबरोबर शिक्षण ,आरोग्य ,रोजगार या विकासाच्या मुद्द्यावर‌‌ प्रथमच गटातटाच्या राजकारणाला ‌घराणेशाहीला‌ छेद दिला आहे. प्रस्थापित राजकारण्यांना आव्हान देऊन सर्वसामान्य शेतकऱ्याचा सुपुत्र म्हणून शेतकरी सर्वसामान्य जनता कष्टकरी युवकांसाठी विकासासाठी ही निवडणूक लढवली असल्याने मतदारसंघातील जनता ‌विकासाच्या मुद्द्यावर आपणाला ‌मतदान करून ‌ विजयी करणार असल्याचा विश्वास प्रा. रामदास झोळ सर यांनी केला आहे. करमाळा तालुक्यातील शेतकरी महिला युवक नागरिकांनी घराबाहेर पडून १००% मतदान करून आपला हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!