करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आॅनलाईन शिक्षण चालू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

करमाळा प्रतिनिधी. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे विद्या विकास मंडळाच्या विश्वस्त आणि काॅलेजचे प्राध्यापक यांची मिंटीग संप्पन झाली. या मिंटीगमध्ये आॅनलाईन शिक्षण घेण्यासंदर्भात निर्णय झाला. या मिंटीगसाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर संस्थेच्या विश्वस्त स्वभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिक्षणापासून एक विद्यार्थी वंचित राहू नये यांची दक्षता प्राध्यापकांनी घेण्यासंबंधीच्या सूचना दिल्या. महाविद्यालयाच्या, ज्यूनियर काॅलेज यांच्या परीक्षा सध्याच्या घडीला घेणे अवघड आहे, तरी ही त्यांचा अभ्यास या आॅनलाईन शिक्षण पध्दतीने घेणे आपल्याला जमू शकते. आपल्या काॅलेजला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, त्यांचे शिक्षण व्यवस्थित होणे आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. बारावीचा नुकताच निकाल लागला आहे तरी सोप्या पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. विश्वस्त मिंटीगला सोशल डिस्टेसिंग पाळत ही मिंटीग पार पाडण्यात आली.प्राचार्य सर्व प्राध्यापक उपस्थित होते…
