राजुरीतील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध राहणार : डॉ. विद्या दुरंदे, ग्रामपंचायत सदस्या,राजुरी
राजुरी प्रतिनिधी
राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उच्चशिक्षित अशा डॉ.विद्या अमोल दुरंदे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बहुमताने निवड झाली. *महिलांच्या स्वाभिमानासाठी जिजाऊ सावित्रीची लेक मैदानात* हा नारा घेऊन निवडणुकीत सामोरे गेल्या त्याला महिलांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला.महिला उमेदवारांना घेऊन प्रत्येक घरोघरी जाऊन महिलांच्या प्रश्नांवर चर्चा केली. यापूर्वी डॉ. विद्या दुुरंदे यांनी महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिर, पाणी फाउंडेशन मध्ये श्रमदान शिबिर, रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर, बचत गट मेळावे, योगासने शिबिरतसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक गोरगरीब गरजू पेशंटला मदत करण्यात येते अशी अनेक समाज उपयोगी कामे केल्यामुळेच गावाच्या सार्वजनिक हिताचा आश्वासक चेहरा तयार झाला.येणाऱ्या काळात विकासरत्न आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये महिलांचे आरोग्य मेळावे, स्त्रीभ्रूणहत्या थांबविणे,महिला बचत गटांना आर्थिक सहकार्य करणे,महिलांना स्वयंरोजगारासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणे, महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे, महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे, मुलींसाठी मोफत शैक्षणिक योजना सुरू करणे असे अनेक लोकउपयोगी कामे करण्यात येतील, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्या डॉ. विद्या दुरंदे यांनी दिली आहे.
