आ.संजयमामा शिंदे यांचे हस्ते कुकडी प्रकल्पग्रस्त लाभार्थींना भूसंपादन धनादेशाचे वाटप.
.
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून चालू अर्थसंकल्पात कुकडी प्रकल्पग्रस्त करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनासाठी 35 कोटी निधीची मागणी केलेली होती. यापैकी 28 कोटी निधी सध्या प्राप्त झालेला असून या निधीमधून खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याची काम सध्या सुरू आहे.
करमाळा तालुक्यातील एकूण 1150 हेक्टर क्षेत्र कुकडी प्रकल्पांतर्गत संपादित झालेले असून यापैकी 13 गावातील भूसंपादनाचे प्रस्ताव भूसंपादन कायदा 2013 अन्वये प्रांत कार्यालय कुर्डूवाडी यांचेकडे सध्या सादर केलेली असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. करमाळा तालुका लाभक्षेत्रातील वीट, झरे, करमाळा ग्रामीण, पोफळज ,जातेगाव कामोणे, रावगाव ,पोंधवडी ,पोथरे, घरतवाडी, कुंभारगाव, सावडी ,कोर्टी या 13 गावातील शेतकऱ्यांचे भूसंपादन सध्या होणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात 1 कोटी रुपये धनादेशाचे वाटप आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करमाळा येथील संपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता आर.के .जगताप, उपविभागीय अभियंता एस.डी. मेहेर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार शिंदे यांच्या हस्ते उषा कृष्णा धुमाळ, कृष्णा हरिभाऊ धुमाळ ,जालिंदर सोपान जाधव ,राजेंद्र बलभीम नलवडे, प्रल्हाद श्रीरंग जाधव , शालन रामचंद्र पाटील ,बाळू ज्ञानदेव पडवळे, महिपत बाळासो नलवडे यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले .
चौकट…
लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी पुढे यावे – कार्यकारी अभियंता आर.के. जगताप यांचे आवाहन
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवडी चे कार्यकारी अभियंता आर .के. जगताप म्हणाले की, शेतकऱ्यांची कागदपत्रे वेळेत न आल्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला विलंब लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेताचे 7/12 ,8 अ उतारे तसेच फेरफार उतारे, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आदी कागदपत्रांसह उपविभागीय अभियंता मेहेर मो.न – 90 96 92 87 41 तसेच पॅनल वकील कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रतापसिंह पाटील – 75 88163471 यांच्याशी संपर्क करून आपली भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले
