सोगावचे सरपंच विजय गोडगे यांच्याकडून लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे मोफत लसीकरण
करमाळा प्रतिनिधी जनावरांमधील लंपी स्किन आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक झाले असुन त्याचा भाग म्हणुन सोगावचे सरपंच विजय गोडगे यांनी स्वखर्चातुन जनावरासाठी लसी दिल्या आहेत यामुळे सोगावमधील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.लम्पी स्किन चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे गरजेचे होते सामाजिक बांधलिकिच्या भावनेतुन जनावरांसाठी मोफत लस दिल्याबद्दल सरपंच विजय गोडगे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
