शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात सोलापुरात राष्ट्रवादीचा एल्गार युवा नेते अभिषेक आव्हाड यांचा सरकारला गंभीर इशारा
राज्यातील शिंदे फडणवीस च्या चाकरी सरकारने राज्यातील वेदांता ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर जाऊन गुजरातला दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित राज्यव्यापी आंदोलनांतर्गत आज रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडणवीस-शिंदे सरकारच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन करून तशा आशयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना युवकचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने आर डी सी शमा पवार मॅडम यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी करमाळा तालुक्याचे युवा नेते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी दैनिक सहकारशी बोलताना माहिती दिली कि जवळपास 1 लाख बेरोजगारांना या वेदांत प्रकल्पामुळे रोजगार मिळणार होता परंतु सरकारच्या निष्काळजी पणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आता जर येणाऱ्या काळात हा वेदांत प्रकल्प गुजरातवरून पुन्हा महाराष्ट्रात आणला नाही तर युवकांना घेऊन रस्त्यावर उतरू व जोपर्यंत प्रकल्प महाराष्ट्रात परत येत नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरून देणार नाही असा इशारा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, माळशिरस युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, करमाळा तालुका किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपासथित होते.
