Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

केळीच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून मदत मिळावी : शंभुराजे जगताप यांची पालक मंत्र्यांकडे मागणी .

करमाळा प्रतिनिधी रविवार दिनांक ४ जून रोजी वादळी वारा व वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त होवून शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे . तरी नुकसान झालेल्या भागातील केळीच्या बागांचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे . तसेच मौजे गुळसडी येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज कोसळून पती व मुलादेखत कमल अडसूळ हि महिला मृत्युमुखी पडली .त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी देखील जगताप यांनी निवेदनाव्दारे केली आहे . निवेदनाच्या प्रती उचित कार्यवाही साठी आमदार संजयमामा शिंदे , जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या आहेत .-* रविवार दिनांक ४ जून रोजी वादळी वारा व वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त होवून शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे . तरी नुकसान झालेल्या भागातील केळीच्या बागांचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे . तसेच मौजे गुळसडी येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज कोसळून पती व मुलादेखत कमल अडसूळ हि महिला मृत्युमुखी पडली .त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी देखील जगताप यांनी निवेदनाव्दारे केली आहे . निवेदनाच्या प्रती उचित कार्यवाही साठी आमदार संजयमामा शिंदे , जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या आहेत .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group