आध्यात्मिककरमाळा

करमाळ्यात गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत

करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे  जल्लोषात स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा वापर, गुलाल विरहित मिरवणूक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भाविकांनी भर दिल्याचे दिसून आले. सकाळपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मोरया मोरयाचा गजर सकाळपासूनच कानी पडत होता. भक्तिमय वातावरणात भाविकांनी आपपल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना केली; तर सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली.करमाळा शहरात,ग्रामीण भागात गणरायाचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.लहान मोठे मंडळांनी आप आपल्या गल्लीत गावात गणरायाची प्रतिष्ठापणा केली
आहे. मूर्तिकाराच्या दुकानापासून बँड पथकाच्या तालावर युवकांनी मिरवणूककाढत गुलालाची उधळण करत आपापल्या गल्लीत गणरायाची प्रतिष्ठापणा केलीहोती.ग्रामीण भागात काही ठिकाणी लेझीम झांज पथकाच्या तालावर युवकांनी मिरवणूक काढत प्रतिष्ठापणा केली होती सर्वत्र ऊत्साही आनंदाचे वातावरण होते.यावेळी शहरातील सर्व रस्ते गजबजले होते गणरायाचे विविध साहित्य खरीदी करण्यासाठी घरातील महिला मंडळ तसेच लहान मोठे नागरिक मुलांनी गर्दी केली होती.यावेळी करमाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
फुलांचा भाव वधारला
बाप्पाची आरास, आरतीसाठी फुले, हार यासाठी फुलांची आवश्यकता भासतेच. त्यामुळे गणपती आगमनाच्या पहिल्याच दिवशी फुलांचा भाव वधारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एरव्ही २० रुपयांना मिळणाऱ्या फुलांच्या हाराची किंमत दुपटीने वाढल्याचे पाहायला मिळाले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group