माजी आमदार नारायण पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांच्या हस्ते घोटी येथे मकरसंक्रातीनिमित्त एक हजार महिलांना चांदीचे लेणं व पाण्याचे माठ वाटप
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील घोटी येथे सरपंच सविता राऊत यांनी मकरसक्रांतीनिमित्त कुंतीचे वाण लुटण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी या कार्यक्रमाची वाण वाटण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार नारायण पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी घोटी गावातील महिलांना एक हजार चांदीची जोडवी व एक हजार पाण्याच्या माठांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पाथुर्डी सरपंच रुक्मिणी मोटे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या पत्नी शुभांगी कांबळे, वरकुटे येथील सरपंच यांच्या पत्नी रेखा भांडवलकर या उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घोटी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
