Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

स्त्रियांनी आपल्या पायावर स्वाभिमानाने उभारुन आपल्या कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार करून धाडसाने समाजात पुढे येऊन समाजसेवेसाठी कार्यरत रहावे – रश्मी दिदी बागल

करमाळा प्रतिनिधी स्त्रियांनी आपल्या पायावर स्वाभिमानाने उभारुन आपल्या कुटुंबातील मुलांवर चांगले संस्कार करून धाडसाने समाजात पुढे येऊन समाजसेवेसाठी कार्यरत रहावं असे आवाहन साखर संघाच्या संचालिका रश्मी दीदी बागल  बागल यांनी आज मौजे हिवरवाडी ता.करमाळा येथील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक प्रमोद झिंजाडे उपस्थित होते.हिवरवाडी ता. करमाळा येथे विधवा महिलांकरिता संक्रांतीनिमीत्त आयोजित हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता.त्यावेळी रश्मी बागल या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर यशकल्यानिचे गणेश करे पाटील, पत्रकारसंघाचे अध्यक्ष व वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, पत्रकार प्रा.एन.डी.सुरवसे सर,प्रा.प्रदिप मोहिते सर,हरिश्चंद्र झिंजाडे, सरपंच सौ.अनिता पवार, उपसरपंच संभाजी गुळवे, पत्रकार विशालनाना घोलप,समाधान कडवकर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी थोर समाजसुधारक राजा राममोहन राँय,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन रश्मी बागल,प्रमोद झिंजाडे, गणेश करे पाटील, प्रा.प्रदिप मोहितेसर,सरपंच अनिता पवार,प्रा.एन डि सुरवसे सर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते केले.प्रास्ताविक आयोजक कुमारी सुप्रिया पवार यांनी केले. यावेळी सौ.बागल म्हणाल्या की,स्त्रियांनी समाजात धाडसाने पुढे आले पाहिजे. आज ही काळाची गरज आहे. आपल्या काही अनिष्ट रूढी परंपराचा आजही पगडा आहे. त्याकरिता अनेक समाजसुधारकांनी या रूढी परंपरा दुर करण्याचा प्रयत्न केला.गावच्या सरपंच सदस्यांनी व प्रा.मोहिते सर यांनी यात पुढाकार घेत एका अभिनव व क्रांतिकारी कार्यक्रम आयोजित करून एक आदर्श पुढे ठेवला आहे. वास्तविक माझ्या वडिलांनी मांडी ता.करमाळा येथे सर्व महिलांसाठी माहेर मेळावा आयोजित करून त्यामध्ये सर्वच महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात विधवा महिलांनाही सन्मानाने निमंत्रित केले होते. हे पाऊल मला वाटतं सर्वासाठी प्रेरणा देणारे आहे. यश। कल्यानीचे गणेश करे पाटील यांनी समाजात सतीची अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी राजा राममोहन राँय यांनी तर स्रीयांच्या शिक्षणासाठी महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले. आज समाजात बोलके सुधारक जास्त आहेत पण बोलण्यापेक्षा खऱ्या अर्थाने क्रुती करणाऱ्या समाजसुधारकांची गरज आहे. आपल्या तालुक्यात रश्मी दिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील महिला धाडसी होऊन पुढे येत आहेत.ही अभिमानाची गोष्ट आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष व वंदनीय बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी विधवा महिलांना समाजात मानसन्मान प्रतिष्ठा देण्यासाठी हिवरवाडी गावच्या सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेला हा उपक्रम तालुक्यातील पहिला असा कार्यक्रम आहे आणि. रश्मीदिदी आजच्या कार्यक्रमास उपस्थित आहेत ही स्रियांसाठी निश्चितच प्रेरणादायी गोष्ट आहे. परंतु महिलांच्या आरोग्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. आरोग्य सुविधा प्राधान्याने देणेकरीता वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व मुख्यमंत्री मदत कक्षाच्या वतीने रूग्णांसाठी मोफत उपचारासाठी वैद्यकीय मदत कक्ष आपणासाठी धाऊन येईल. व्यासपीठावर उपस्थित रश्मीदीदींनी व इतर मान्यवरांनी महिलांकरिता गावोगाव महिला आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे त्याकरिता वैद्यकीय कक्ष निश्चित मदत करेल. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा.प्रदिप मोहिते यांनी आपल्या भाषणात गावच्या सरपंच सौ.अनिता पवार यांनी गावातील महिलांसह आयोजित केलेला हा कार्यक्रम हा तालुक्यातील पहिलाच असा पथदर्शी कार्यक्रम आहे. राजा राममोहन राँय यांच्याप्रमाणेच ताराबाई शिंदे यांनी सतीची प्रता बंध करण्यासाठी मोठं योगदान दिले आहे. समाजाला घडविण्याची दिशा देण्यासाठी गावच्या प्रगतीसाठी महिलांची एकी व शक्ती ही निश्चित पणे उपयोगी आहे. हा आदर्श हिवरवाडीतील सुप्रिया पवार हिच्यासारख्या विद्यार्थीनीने आपल्या गावासाठी घालुन दिला आहे. हे कौतुकास्पद आहे. अध्यक्षीय मनोगतात महत्मा फुले समाजसेवी संस्थेचे प्रमोद झिंजाडे यांनी विधवा स्त्रियांनी सन्मानाने जगण्यासाठी लवकरच असा कायदा राज्यसरकार करत आहे. याकरिता कोणत्या प्रक्रीयेतून आपण स्वतः प्रयत्न केले याचा खुलासा करीत राज्याचे उपमुख्यमंत्री असा पुरोगामी कायदा करण्यासाठी अनुकूल आहेत. ही समाधानाची बाब असल्याचे नमूद करून महिलांनीही आता या परंपरा व रूढींनी झुगारून आपल्या प्रगतीसाठी सज्ज रहावं असं आवाहन केले. या कार्यक्रमात गावच्या ग्रामसेविका श्रीमती जयश्री सुतार यांचा विषेश सन्मान रश्मी दिदी बागल व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन उपस्थित २१ विधवा महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाबरोबरच त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच २ पुनर विवाह महिलांचा पण सन्मान यावेळी झाला आणि १५० महिलांना पण १७५ भेटवस्तू देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले. तर आभार सरपंच अनिता पवार यांनी मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापू इरकर,वैशाली इरकर, प्रियंका इवरे,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिल पवार ,गणेश इवरे,सोपान पवार,दत्तू इरकर,आजिनाथ इरकर,गोविंद पवार, मधू पवार, बिभीषण सांगळे,प्रकाश पवार,पोलिस पाटील गिता पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापू पवार, कैलास पवार, नाना गुळवे,संगिता पवार, शितल पवार,मधुकर इरकर,मारुती पवार,रामा सांगळे तसेच गावातील इतर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group