Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

माढा व करमाळा विधानसभा निवडणूक धनुष्यबाणावरच लढवणार- संपर्कप्रमुख रवी आमले

करमाळा प्रतिनिधी 

आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे या दोघांनीही महायुतीला रामराम करून अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता करमाळा व माढा या दोन्ही विधानसभेच्या जागा शिवसेना धनुष्यबाणावरच लढवणार असून यात कुठलीही तडजोड करणार नाही तसा अहवाल आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिला आहे अशी माहिती शिवसेना करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांनी दिली आहे.करमाळा व माढा विधानसभा ही दोन्ही मतदार संघ शिवसेना गेली 25 ते 30 वर्षापासून धनुष्यबाणावर लढवत आहे.माढा विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी धनुष्यबाणाला 75 हजार मते मिळाली होती आता त्या ठिकाणी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासारखा तगडा उमेदवार असून आम्ही माढा मतदारसंघ सहजपणे जिंकू शकतो

मतदार संघात अनेक पक्षांचे अनेक उमेदवार उभे राहणार असल्यामुळे शिवसेना धनुष्यबाणावर निवडून येणार आहेत.करमाळा मतदारसंघात सुद्धा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पूर्ण तयारी केली असून त्यांचा संपूर्ण तालुक्याचा दौरा झाला आहे.वैद्यकीय मदत कक्ष बांधकाम कामगारांची नोंदणी सर्वसामान्यांना मदत आरोग्य शिबिरे यामुळे दांडगा जनसर्प झाला आहे.राज्यात आता एकनाथ शिंदे नावाचा ब्रँड झाला असून प्रत्येक तालुक्यात एकनाथ शिंदे यांना मानणारे 25 ते 30 हजार मतदार तयार झाले आहेतकरमाळा तालुक्यातील 25 ते 30 हजार शिवसेनेला मानणारे मतदार आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना देऊन सर्व महिलांचे हृदयात स्थान मिळवले आहे.मोफत एसटी बसमोफत वीज,वयोश्री योजना महात्मा महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा योजनांमुळे मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे याचाही फायदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाला होणार आहे.+++

खासदार श्रीकांत शिंदे यांची एक टीम करमाळा व माढा मतदार संघात सर्वे असून दसऱ्यानंतर करमाळा माढा या विधानसभा मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक घेणार असल्याचे रवी आमले यांनी सांगितले
******भारतीय जनता पार्टीने बाहेरचा उमेदवार घेऊन करमाळा मतदारसंघावर दावा करून महायुतीमध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम करू नये असेही रवी आमले यांनी शेवटी सांगितलें आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group