आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी सावंतसराच्या सुचनेनुसार बागल आम्ही एकत्र काम करणार असुन सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -मा.आ.नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी आदिनाथ कारखान्यांबाबत आम्हाला व बागलांना एकत्र काम करण्याच्या सूचना प्रा. तानाजी सावंत यांनी आम्हाला दिले असून याप्रमाणे भविष्यात कारखान्याचे कामकाज केले जाणार आहे असे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केले. आम्ही आदिनाथ सहकारी ठेवण्यासाठी यशस्वी झालो आहोत मात्र यापुढे आदिनाथ सुरू करण्यासाठी आम्हाला तालुक्यातील सर्व लोकांचे सहकार्य लागणार आहे. श्री.आदिनाथ सह.साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी आरोग्यमंञी तानाजी सावंत यांनी नऊ -दहा कोटी रूपये भरले आहेत.सावंत यांनी हे पैसे भरल्यानेच कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यास संधी मिळाली असुन सभासदाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे
रविवार ता.28 राेजी आदिनाथ सहकारी कारखाने वरती आदिनाथ मंदिरात आदिनाथ महाराजांना अभिषेक घालुन कारखान्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला .
यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले ,आदिनाथ कारखाना सहकारीच राहीला पाहिजे यासाठी आपण आदिनाथ महाराजांच्या आशीर्वादाने प्रयत्न केले आणि त्याला यश आले आहे. माझे वडील स्व.गोविंदबापु पाटील व इतर मंडळीचा या कारखान्यासाठी मोठा त्याग आहे.या त्यागाची जाणीव ठेवुन मी कारखान्यासाठी प्रयत्न केला. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे सहकार्य केले आहे. यापुढेही त्याचे सहकार्य राहणार आहे. हा कारखाना सुरू सुरळीत चालण्यासाठी आदिनाथ महाराज योग्य मार्ग दाखवतील अशी मी आशा बाळगून आहे . वास्तविक पाहता आदिनाथ कारखान्याची एवढी दुरावस्था झालेली असताना देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कारखान्यासाठी नऊ दहा -कोटी रुपये भरले, ही फार,मोठी गोष्ट आहे. चालू सिझनला कारखाना सुरू करून पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या वेळी हरिदास डांगे, देवानंद बागल, जयप्रकाश बिले ,डाॅ.वसंत पुंडे यांनी आपले विचार व्यक्त केले.साडे येथील ऊस उत्पादक शेतकरी दत्ता जाधव यांनी कारखान्यासाठी एक लाख रुपये रोख मदत यावेळी दिली.यावेळी ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
