करमाळा

देशभरातील पत्रकार, संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा

मुंबई /प्रतिनिधी

देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ राजा माने यांनी आज मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय पत्रकार महासंघाची स्थापना झाल्याचे घोषित केले.
महाराष्ट्रातसह देशभरातील माध्यमातील सर्व पत्रकार, संपादक व विविध पत्रकार संघटना यांचा या महासंघामध्ये समावेश असणार असून पत्रकार, संपादकांच्या विविध समस्या व न्याय हक्कासाठी ही संघटना देशभर काम करणार आहे.
यावेळी बोलताना राजा माने म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना व विविध दैनिक, साप्ताहिकांच्या संपादकांना एकत्र करून राष्ट्रीय पत्रकार महासंघ देशभरात उत्तम संघटन करणार आहे. साप्ताहिक दैनिक यांच्या समोर असलेल्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ काम करणार आहे.

चौकट

पत्रकार संपादक यांच्यासह संघटनांचा सहभागराजा माने यांनी आज घोषित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार महासंघात देशभरातील पत्रकार संपादक व विविध पत्रकार संघटना या महासंघात सहभागी होणार असल्याने एकसंघपणे पत्रकारांची एकजूट देशभरात दिसणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!