Wednesday, January 8, 2025
Latest:
करमाळा

पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे -पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब.

करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे नक्कीच समाजाचे कल्याण होईल असे मत करमाळा पोलिस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार सन्मानाचा कार्यक्रम करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होते.यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब म्हणाले पत्रकार पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू. तशी दोघांचीही दुःखे सारखीच. पत्रकार म्हणजे समाजप्रबोधन समाजबदलाचे खरे पाईक असुन जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून काम सामाजिक जीवनात काम करत असताना गुन्हेगारीला आळा घालून न्याय मिळवून देण्यासाठी ‘पत्रकाराचे मिळालेले सहकार्य कौतुकास्पद आहे.प्रशासनात काम करताना पोलीस म्हणून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मग यात मानपान, मोठेपणा अशा गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून अनेक बाबींना सामोरे जावे लागते. तसाच प्रकार पत्रकार बांधवांनासोबतही घडतो पण मातृ-पितृ गुरु तसेच समाजाचे ऋण फेडण्याचे समाधान पत्रकार व पोलिसांना मिळत असल्याने खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा ‌ आपणाकडून घडत असल्याने आपण नक्कीच भाग्यवान असून समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे कार्यरत राहावे विधायक चांगल्या कामासाठी पोलीस प्रशासन म्हणून सदैव पाठबळ देऊन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे होते. पत्रकार दिनानिमित्त पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांच्या हस्ते करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, वंदे मातरम पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास घोलप, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, ज्येष्ठ पत्रकार नासीरभाई कबीर, आशपाक सय्यद , जयंत दळवी शितलकुमार मोटे,अशोक नरसाळे, विशाल घोलप ‌, हर्षवर्धन गाडे,अशोक मुरूमकर, प्रफुल दामोदरे, नानासाहेब पठाडे ,सुनील भोसले, सिद्धार्थ वाघमारे , नागेश चेंडगे, ‌प्रशांत भोसले, राजू सय्यद तुषार जाधव, सूर्यकांत होनप, दस्तगीर मुजावर उमेश पवळ यांचा गुलाब पुष्प पेन देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन पोलीस पाटील संदीप‌ शिंदे पाटील यांनी केले तर आभार अशोक नरसाळे यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!