दहिगाव सब स्टेशन येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा -संजय सावंत माजी नगरसेवक क,न,प,
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी करमाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय सावंत यांनी आज आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी माजी नगरसेवक फारुक जमादार, मार्तंड सुरवसे, पांडुरंग सावंत आदी जण उपस्थित होते
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा नगरपरिषद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या दहिगाव सबस्टेशन येथे जेऊर वरुन वीज पुरवठा केला जातो परंतु जेऊर ते दहिगाव दरम्यान अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती येऊन अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो परिणामी करमाळा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो त्यामुळे दहिगाव सबस्टेशन येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आल्यास तेथे वीज पुरवठा खंडित होणार नाही आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल त्यामुळे दहिगाव सबस्टेशन येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा असे सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे