दत्तकला इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर काॅलेजमध्ये संविधान दिन साजरा
करमाळा प्रतिनिधी
प्रा.प्रविण अंबोधरे
दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर कॉलेज स्वामी चिंचोली येथे आज संविधान दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोरोणाच्या पार्श्र्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करुन इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग महाविद्यालयात भरवण्यात आले आहेत, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी योग्यरित्या घेत आहेत.
विद्यार्थ्यांकडुन संविधानाचे वाचन करुन महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर तसेच सचिव प्रा.झोळ मॅडम उपस्थित होत्या त्याचबरोबर स्कुल विभागाच्या डायरेक्टर सौ.ताटे मॅडम, प्राचार्या यादव मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
