करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात -भरत भाऊ आवताडे
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले आहे.. आमचें नेते माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार महायुती धर्मपाळत या निवडणुकीत उरण्याचा निर्णय असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय खेळी खेळली जाते का हे याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.करमाळा नगरपालिकेची एक नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडण्यासाठी १० प्रभागातून निवडणूक होत आहे. माजी आमदार शिंदे यांनी सुरवातीलाच या निवडणुकीत महायुती म्हणून उतरण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह घेऊन बानू जमादार, आशपाक जमादार, स्वाती फंड, महादेव फंड, तेजल मोरे, ऋषिकेश शिगजी, गणेश माने, सुवर्णा जाधव, प्रशांत जाधव, धनश्री दळवी व सुहास ओहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष आशपाकभाई जमादार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जिल्हा अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील,उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रसाद जगताप, फारूख जमादार,बबन चांदगुडे उपस्थित होते.


