करमाळानिधन वार्ता

कुंकू गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक शरद काका पेठकर यांचें दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी. 
कुंकू परिसरातील ज्येष्ठ नागरिक शरद दिगंबर पेठकर यांचे २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुंकू  गल्ली परिसरामध्ये  हळहळ केली जात आहे.
स्वभावाने मनमिळावू आणि प्रेमळ असलेल्या शरद पेठकर यांनी दिवाणजी म्हणून अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. आपल्या कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवण्याच्या वृत्तीमुळे ते परिसरात “शरदकाका” म्हणून ओळखले जात होते..शितल पेठकर (जाधव हॉस्पिटल येथे कार्यरत) हे त्यांचे सुपुत्र होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे, एक मुलगी व जावई असा परिवार आहे.अंत्यविधी आज दुपारी ठीक २ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!