करमाळा

सौ. जयश्री (ताई) विलासराव घुमरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा नगरपालिकेतील महिला कामगारांच्या वतीने सौ. जयश्री (ताई) विलासराव घुमरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी एकत्र येत त्यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमात जयश्री ताई यांच्या सामाजिक व सहकार्यशील स्वभावाचा विशेष उल्लेख करण्यात आला. नगरपालिकेतील महिला कामगारांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे कामकाजात सुसूत्रता व सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांनी जयश्री ताईंना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभावे, अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम साधेपणाने मात्र उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी गणेश वळेकर ओम साळुंखे होनराव उपस्थित होते.
महिला कामगार व सफाई कर्मचाऱ्यांच्या एकोप्याचे दर्शन या निमित्ताने घडले. जयश्री ताईंनी सर्वांचे आभार मानत, “आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच मला काम करण्याची ऊर्जा मिळते,” अशी भावना व्यक्त केली.कार्यक्रमास नगरपालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!