केम येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर महादेव मंदिर येथे २१ हजार ७०८ बेलपत्र वाहण्याचा कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जागृत देवस्थान असलेले येथील उत्तरेश्वर देवस्थान महादेवाचे अतिप्रचीन मंदिर असून श्रावणी चौथ्या सोमवारच्या निमित्ताने 21 हजार 708 महादेवाला बेलपत्र वाहण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. केम व परिसरातील 101 दांपत्यांनी या 21 हजार 708 बेलपत्र वाहनेच्या धार्मिक विधी कार्यक्रमात सहभाग घेतला होता.सकाळी सात वाजल्यापासून बेलपत्र वाहण्यात आले दुपारी दोन वाजता या बेलपत्राचे वाहण्याचा संकल्प विधी पूर्ण करण्यात आला . दुष्काळ हटावा निसर्गाची अवकृपा दूर व्हावी पाऊस पडुन बळीराजावरील संकट दूर व्हावे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण भरावे याकरता पुणे व महाराष्ट्रातमध्ये पाऊस पडावा असा संकल्प करून बेलपत्र वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सपत्नीक बेलपत्र वाहण्याचा संकल्प पूर्ण केला. बेलपत्र वाहण्याच्या कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्वांना शाबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. 101 दांपत्याच्या उपस्थितीमध्ये महाआरती करून हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुजारी महिला भगिनी यांनी बेलपत्र आणण्यापासून पूजा संपन्न होईपर्यंत परिश्रम घेतले. या कार्यक्रमास केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
