दत्तकला आयडियल स्कुल व ज्युनिअर कॉलेज केत्तुर नं 1 मध्ये अकरावी विज्ञान शाखेत मुलींसाठी मोफत प्रवेश – प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील गरिब व होतकरु मुलींनी शिक्षणावरती आपल्या नावाचा ठसा उमटावा म्हणुन दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर यांच्या कल्पनेतून चालु शैक्षणिक वर्षापासून जे पालक अल्पभूधारक, भुमिहिन व शेतमजुर आहेत, त्यांचे वार्षीक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत आहे अशा पालकांच्या ज्या मुलींना इयत्ता दहावी मध्ये 85% पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांना मेरिट नुसार पहिल्या 30 मुलींना दत्तकला आयडियल स्कुल व ज्युनिअर कॉलेज केत्तुर नं 1 कडुन मोफत प्रवेश दिले जातील. त्यासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे व नाव नोंदणीची शेवटची मुदत 15 आॅगस्ट 2020 पर्यत असेल. विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला.
• 10 वी चा निकाल.
• आधारकार्ड झेरॉक्स
• पालक अल्पभूधारक व भुमिहिन असल्याचा तहसिलदार यांचा दाखला.
• पालकांचा एक लाखापर्यंत उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला.या कल्पनेपाठीमाघे प्रा.झोळ सर यांचा एकच मानस आहे की ग्रामीण भागातील मुलगी शिकावी व तिची प्रगती व्हावी, जेणेकरुन ग्रामीण भागातील मुलींना शैक्षणिक सुविधांच्या उणिवा भासणार नाहीत व सर्व शहरी भागातील सुविधा त्यांना त्यांच्या जवळच्या भागात मिळाव्यात हाच या योजनेपाठीमागचा प्रा. रामदास ज्ञझोळ सरांचा उद्देश आहे . या साठी दत्तकला शिक्षण संस्था दरवर्षी पाच लाख रुपयांचा अतिरिक्त भार उचलणार आहे.महाविद्यालयाचा दरवर्षी इयत्ता दहावी व बारावीचा निकाल सलग पाच वर्षे 100 % लागत असुन तिथे विद्यार्थ्याची चांगली तयारी करुन घेतली जाते म्हणुन गरिब घरातील विद्यार्थीनीं आधुनिक शिक्षणापासुन वंचित राहु नये यासाठी हा उपक्रम संस्था राबवत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन प्रवेशप्रक्रिया अर्ज भरुन आपला प्रवेश निश्चित करावा.https://forms.gle/pE7sBB3j8gGL79Nd8 व सर्व कागदपञे महाविद्यालयात आणुन जमा करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विजय मारकड सर यांच्याकडून करण्यात आले आहे.
श्री.विजय मारकड
7721902929
9623417879
