करमाळा

करमाळा तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत निकालाची उ़ज्वल यशाची पंरापंरा कायम

करमाळा प्रतिनिधी.                                 महाराष्ट्र राज्य बोर्ड माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च -२०२० मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल  संकेतस्थळांवर घोषीत करण्यात आला. यामध्ये कुमारी प्रेरणा सुखदेव मोहोळकर हिने  ९७ % गुण मिळवून करमाळा तालुक्यात  प्रथम क्रमांक मिळवला आहे. दहावीच्या परीक्षेत करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयामध्ये सर्वाधिक उत्कृष्ट गुण मिळवत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात  प्रथम क्रमांक – कुमारी प्रेरणा सुखदेव मोहोळकर (गुण ४८५ /५०० ९७ %), द्वितीय क्रमांक – कुमार सुमित नितीन दळवे ( गुण-४८२ /५००  ९६.४०%) कु.सिद्धी विनोदकुमार गदिया (गुण-४८२/५००  ९६.४०%), तृतिय क्रंमाक कु. बिनवडे स्नेहल श्रीराम (गुण ४८१ / ५०० ९६.२०%), कु. सृष्टी सुखदेव मोहोळकर (गुण ४८१ / ५०० ९६.२०%) असे आहेत. या विद्यालयात एकुण ३६२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १५७ विदयार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी, १११ विदयार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ६६ विदयार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंतराव जगताप, संस्थेचे विश्वस्त नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप, प्राचार्य पोपटराव कापले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.तसेच करमाळा शहरातील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचा एकूण निकाल ९६.५७% लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक कु. जगताप साक्षी रघुनाथ- ९३.८०%, द्वितीय क्रमांक कु.येलाले साक्षी शंकर- ९२.८०% तृतिय क्रंमाक कु. मोहिते प्रांजली गणेश- ९२.६०% असा निकाल लागला असून सर्वांचे अभिनंदन मुख्याध्यपक व शिक्षकांनी केले.करमाळा शहरातील श्री.गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित श्री गिरधरदास देवी विद्यालयाचा १००% निकाल लागला असून यात प्रथम क्रमांक कु. श्वेता काकडे ८५%, द्वितिय क्रमांक कु. कोमल ढेरे ८४.४०% तर तृतीय क्रमांक कु. करुणा घोडके ८४% असे क्रमांक मिळविले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे पदाधिकारी अमोदशेठ संचेती, कन्हैय्यालाल देवी, सुनिता देवी, चंद्रकांत देवी यांनी अभिनंदन केले.श्री.कमलादेवी कन्या प्रशालेचा १० वि चा निकाल ८९.४७ % लागला असून यामध्ये  प्रथम क्रमांक साईश्वरी विठ्ठलराव भणगे ९४.४०%, द्वितीय क्रमांकश्रद्धा रवींद्र मुगुस्कर ९२.८०%,  तर तृतीय क्रमांक करुणा शेखर स्वामी ९१.२० % सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देवी व आदींनी अभिनंदन केले. करमाळा तालुक्यातील जेऊर येथील श्री आदिनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९४.८७ %  लागला असून यात प्रथम क्रमांक वैभव जाधव ८९.८० %, द्वितिय क्रमांक ऋतुजा पवळ ८९.६० %,  तृतीय क्रमांक साक्षी पोटे ८६.४० % असे क्रमांक मिळविले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य व शिक्षक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.कविटगाव (ता.करमाळा) येथील मच्छिंद्र नुस्ते विद्यालयाचा ९६.९६% निकाल लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक स्वप्नाली सुखदेव गायकवाड ८३% आणि अनुराधा चंद्रकांत गोडसे ८३%, द्वितीय क्रमांक अश्विनी बळिराम कांबळे ८२ % तृतीय क्रमांक क्रांती सतीश सावंत ७८ % या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र नुस्ते, उपाध्यक्ष प्रवीणशेठ दोशी, सचिव संतोष नुस्ते ,मुख्याध्यापक भोसले जी.जी.यांनी   अभिनंदन केले आहे.राजुरी (ता.करमाळा)  श्री राजेश्वर विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून  प्रथम क्रमांक माऊली भागवत साखरे ९३ %, द्वितीय क्रमांक  निकिता सुखदेव गायकवाड ९१.४० % तृतीय क्रमांक मुस्कान नजिर मुलाणी ९०.४०% या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे सचिव  लालासाहेब गोविंद जगताप  व प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल झोळ यांनी अभिनंदन केले आहे.सालसे (ता.करमाळा) येथील लाल बहादूर शास्त्री विदयालयाचा दहावी चा निकाल 100% लागला असून प्रशालेचा साडे केंद्रात शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे. प्रथम क्रमांक प्रतिज्ञा शिवाजी पन्हाळकर हिचा आला असून तीला ९४.६० % गुण मिळाले आहेत तर द्वितीय क्रमांक वैष्णवी नवनाथ कदम ९३ % या शाळेत ९० % पेक्षा जास्त सहा विदयार्थी असून ८० % च्या पुढे 20 विदयार्थी आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रविंद्र सपकाळ व मुख्याध्यापक  बाळकृष्ण लावंड यांनी केले.जेऊर (ता.करमाळा) येथील भारत हायस्कुल ९८.३६ % निकाल लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक कांडेकर मनीषा उद्धव ९५.४०%  द्वितीय क्रमांक पाटील सिद्धी दिलीप ९५ % तृतीय क्रमांक क्रांती सतीश सावंत ७८ % या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण पाटील, प्राचार्य अनिल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!