पाणी विषय जगाच्या दृष्टीने महत्वाचा या विषयी जनजागृती होणे काळाची गरज -राजन खान
करमाळा दि.( प्रतिनिधी )-
पाणी हा विषय संपूर्ण जगाच्याच दृष्टीने अतिशय महत्वाचा असताना दुर्दैवाने अजून देखील याचे गांभीर्य सामान्य माणसाला नाहीय,त्यामुळे पाणी या विषयावर जनजागृती आणि सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अक्षर मानवचे मानवचे संस्थापक,प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांनी येथे बोलताना केले.
अक्षर मानव च्या वतीने,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व म.फुले समाजसेवा मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित जल संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे,पं.स.गटविकासाधिकारी मनोज राऊत,म.फुले संस्थेचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे,यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील,प्राचार्य एल.बी.पाटील,एकलव्य आश्रमशाळेचे संस्थापक रामकृष्ण माने,निवृत्त प्राचार्य नागेश माने,ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले,प्राचार्य मिलिंद फंड उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्वच पाहुण्यांनी पाणी या विषयावर आपली मते मांडली.दोन दिवशीय या संमेलनामध्ये प्रमोद झिंजाडे,प्रा.लक्ष्मण राख,डाॅ.विकास वीर,नागेश माने,विवेक येवले,अक्षर मानवचे तालुकाध्यक्ष राहुल माळवे तसेच या संमेलनासाठी बाहेरगावाहून उपस्थित असलेल्या अक्षर मानव च्या सदस्यांनी पाणी या विषयावर आपली मते मांडली.पाण्याचे महत्व,पाणी बचत,पाणी वापर,पाणी साठवण आदी अनेक मुद्द्यांवर संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना खान यांनी पुढील काळात या विषयावर व्यापक चळवळ उभारण्याचा संकल्प व्यक्त करत अक्षर मानव त्यासाठी सतत कार्यरत असणार आहे असे प्रतिपादन केले.या संमेलनास कल्पना मापूसकर मिरा रोड,संजीवनी राजगुरू,सरोज गाजरे बोरिवली,किशोरी पाटील विरार,संजीव साळी बदलापूर,विशाल उबाळे जालना,अनिल आपटे अलिबाग,कांचन बावळे माळशिरस,विजयालक्ष्मी व महावीर गोरे,कु.मृण्मयी गोरे,अमन जाधव पालघर,रश्मी घासकडबी पुणे,विजय खंडागळे,स्नेहालयचे संस्थापक जयंत दळवी,सचिन काळे,खलील शेख आदींसह महाविद्यालयीन विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.