ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी न समजलेले आई-बाप या विषयावर व्याख्यान
करमाळा प्रतिनिधी.प्रा निकत सरांचे ज्ञानसेवा सोशल फाऊंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट च्या वर्धापन दिनानिमित्त मा श्री सोपान कनेरकर यांचे न समजलेले आई बाप या विषयावर जबरदस्त व्यख्यान आयोजित केले आहे.याच निमित्त मागील रविवारी 29 डिसेंबर ला ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती त्याचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला आहे.कार्यक्रम विकी मंगल कार्यालय बस स्टॅन्ड समोर येथे सकाळी 10 वाजता होणार असून सर्वानी वेळेत उपस्थिती राहावे अशी विनंती प्रा निकत सर यांनी केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात करमाळा तालुक्यात अमूलाग्र बदल घडविण्यासाठी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट सतत प्रयत्नशील असते त्याच दृष्टीकोनातून हे व्याख्यान आयोजित केले आहे.त्यासाठी सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.