करमाळा

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची वांगी येथे तोफ धडाडणार सभेचे नियोजन पूर्ण

करमाळा प्रतिनिधी 

करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथे उजनी धरणाच्या काठावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून लढा उभारलेले मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा बुधवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेचे नियोजन पूर्ण झाले असून सभेचे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे या सभेसाठी येणाऱ्या लोकांना दोन मुख्य मार्ग उपलब्ध असून टेंभुर्णी कडून येणाऱ्या लोकांना लोकविकास डेअरी पासून थेट वांगी नंबर एक येथे सभास्थळाकडे जाता येणार आहे. तर करमाळा मार्गे येणाऱ्या लोकांसाठी शेलगाव येथून वांगी नंबर तीन मार्गे सभा ठिकाणाकडे येता येईल. गावापासून पश्चिम दिशेला दीड किलोमीटर अंतरावर सभेचे ठिकाण असून दरम्यान तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे गावापासून सभास्थानापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तो एक दिवसात पूर्ण होणार आहे. पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता व काटेरी झुडपे काढण्यासाठी स्वयंस्पर्तीने या परिसरातील दहा जे.सी.बी मशीन दोन दिवसापासून कार्यरत असून या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तोडून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सभा संध्याकाळच्या वेळी असल्याने सेवेच्या ठिकाणी व रस्त्याने लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे आलेल्या लोकांच्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आले असून या सभेच्या नियोजनासाठी गावातील व या परिसरातील सातशे तरुण स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने काम करणार आहेत. सभा नियोजनासाठी केवळ मराठा सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाहीत तर इतर समाजाचेही कार्यकर्ते प्रयत्न करत असून 171एकर क्षेत्रावर होणाऱ्या या सभेसाठी 50 हजारापेक्षा जास्त लोक उपस्थित राहील असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!