Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

राजपुत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रसिंह ठाकुर यांचा सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

करमाळा प्रतिनिधी राजपुत युवा संघटंनेचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ् कार्यकर्त पत्रकार नरेंद्रसिंह ठाकुर यांना सोलापुर सोशल फाऊडेंशनच्यावतीने सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासुन नरेंद्रसिंह ठाकुर हे सामाजिक काम करीत आहे.पतित पावन संघटनेच्या माध्यमातुन समाजकार्याला सुरुवात केली असुन त्यानंतर डाॅ शामाप्रसाद मुखर्जी सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन आर्थिक दृष्टया दुर्बल असणाऱ्या विद्याथ्याना गणवेश वाटप, खाऊवाटप रक्तदान शिबिर,वृक्षारोपण,आदी सामाजिक उपक्रम राबवले असुन याची पोहचपावती म्हणुन संजय गांधी निराधार योजना सदस्य म्हणुन गोरगरीब वयोवृध्द निराधारांना लोकांना आधार देण्याचे काम केले अनेक युवकांना मार्गदर्शन केले आहे अशा कार्याचा गौरव होणे ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे.प्रामाणिकपणे निरपेक्षपणे समाजाची निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीला सन्मान मिळाला असुन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण, कुणबी मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके,ॲड अजित विघ्ने, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे ,शहराध्यक्ष जगदिश आगरवाल ,सरचिटणीस अमरजित साळुंके,जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, नामदेव शिंपी समाज संघटनेचे अंकुश पिसे,ब्राम्हण संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी सचिव बाळासाहेब होसिंग, जितेश कटारिया, सोनार समाजसंघटनेचे मनोज बुराडे, वीरशैव संघटनेचे शेखर स्वामी,बुरुड समाजाचे अध्यक्ष निखिल मोरे यांनी नरेंद्रसिंह ठाकुर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group