करमाळा

घारगांवच्या मा. सरपंच सौ लक्ष्मी संजय सरवदे-वायकुळे निवडणूक रिंगणात उतरणार*

करमाळा प्रतिनिधी 
पांडे जिल्हा परिषद गट हा यंदाच्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव झाला असून या गटात राजकीय चुरस वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत घारगावच्या माजी सरपंच तथा ग्रामरत्न सरपंच पुरस्कार विजेत्या सौ लक्ष्मी संजय सरवदे-वायकुळे यांनी या गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सौ लक्ष्मी सरवदे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना स्थानिक महिलांचा, आणि तरुण वर्गांचा, शेतकऱ्यांचा चांगला पाठिंबा लाभेल अशी चर्चा ग्रामपातळीवर सुरू आहे‌.
यावेळी लक्ष्मी सरवदे बोलताना म्हणाल्या करमाळा तालुक्यात गाव गाड्यांच्या विकासाशी निगडित अनेक छोट्या ,मोठ्या समस्यांचा डोंगर आहे शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटची व्यवस्था पाण्याची नियोजन, अतिवृष्टीने छोटे-मोठे व्यवसाय, शेतकरी आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना नुकसान ग्रस्तांना वंचित ठेवणे किंवा किरकोळ मदत देण्याचे काम शासन करत आहे. सोलापूर मार्केटमध्ये कांद्याच्या गोणीचा खर्च देखील निघत नसल्याने करमाळा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत अनेक शासकीय कार्यालया मध्ये खासगी लोकांचा सुळसुळाट असून अनेक शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत मिळत नाही विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे असे सर्वसामान्य जनतेत बोलले जात आहे सध्या लक्ष्मी सरवदे यांच्या नावाची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरताना दिसत आहे स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे राजकीय समीकरणे आणि स्थानिक जनतेचा पाठिंबा लक्षात घेता पांडे जिल्हा परिषद गटाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!