करमाळासहकार

सोलापूर जिल्हा दुध संघाच्या संचालकपदी राजेंद्रसिंह राजेभोसले यांना पुन्हा संधी देण्याची मतदार सभासदांची मागणी

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संस्था मर्यादित संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील विद्यमान दूध संघाचे संचालक राजेंद्र सिंह राजेभोसले यांना संधी द्यावी अशी मागणी दूध संघासाठी मतदार असलेल्या सभासदांनी केली आहे, दूध संघाच्या संस्था प्रतिनिधीचे मत जाणून घेण्यासाठी आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये 14 जानेवारी रोजी करमाळा येथील दूध शीतकरण केंद्र बैठक घेण्यात आली. यावेळी करमाळा तालुक्यातील 39 संस्था प्रतिनिधीपैकी 33 सभासद उपस्थित होते. या 33 सभासदांनी आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत ही मागणी केली आहे, आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रत्येक संस्था प्रतिनिधीचे मत जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. यावेळी सर्व संस्था प्रतिनिधीने ज्येष्ठ संचालक राजेंद्रसिंह राजेभोसले यांच्या नावाला पसंती दिली आणि इतर उमेदवार निवडण्याचे अधिकार आमदार संजय मामा शिंदे यांना देण्यात आले आहेत. यावेळी सुभाष गुळवे, चंद्रकांत सरडे, तानाजी झोळ, उद्धव माळी, वामनदादा बदे, राहुल सावंत, भरत आवताडे ,पोपट सरडे, विलास पाटील सुनील सावंत ,दत्ता जाधव, माजी उपसभापती तात्यासाहेब जाधव, भोजराज सुरवसे, माजी सरपंच दिगंबर गाडे, बाळासाहेब ढेरे, सरपंच उदय ढेरे,आदी उपस्थित होते आभार अभयसिंहराजे भोसले यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group