विकासाची दुरदृष्टी असलेले करमाळयाचेआमदार संजयमामानी माझे गाॅडफादर व्हावे -ॲड अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी आमदार संजयमामा यांचे विकासात्मक कार्य करमाळा तालुक्याला समृध्द करण्यासाठी असलेली दुरदृष्टी त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन संजयमामाच्या गटामध्ये प्रवेश केला असुन राजकारणात असणा-या गाॅडफादरची माझी खरी भेट झाली असून मामांनी माझे गाॅडफादर व्हावे असे मत ॲड अजित विघ्ने यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री आजितदादा पवार यांचा मी चाहता आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा हा दृष्टीकोन ठेऊन प्रवेश करत आहे, असे ॲड. अजित विघ्ने यांनी सांगितले.ॲड. विघ्ने म्हणाले, स्व. दिगंबररावजी बागल, जगताप गट, माजी आमदार नारायण पाटील, सवितादेवी राजेभोसले यांच्याकडे काम काम केले आहे. ज्या गटात काम केले तेथील कार्यकर्त्यांना नाराज केले नाही. मामा तुम्ही गॉडफादर व्हावे म्हणून प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.माजी आमदार नारायण पाटील गटाचे पश्चिम भागातील कार्यकर्ते ॲड. विघ्ने यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात शुक्रवारी (ता. 14) नगोर्ले फार्महाऊस येथे कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी आमदार शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
पुढे बोलताना ॲड. विघ्ने म्हणाले, आजितदादा पवार यांचा मी चाहता आहे. पक्षाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा हा दृष्टीकोन ठेऊन शिंदे गटात प्रवेश करत आहे.
बागल गटाकडून ऊसाच्या माध्यमातून आमच्यावर अन्याय झाला. पुढे बारामती ॲग्रोमुळे ऊसाचा प्रश्न सुटला. आमच्या तालुक्याला दूरदृष्टी असलेले नेतृत्व हवं होतं. माझं सर्कल पूर्ण झाले आहे. हा प्रवेश अयुष्यातील शेवटचा आहे, असे ॲड. विघ्ने म्हणाले.ॲड. अजित विघ्ने यांच्यासह दादासाहेब निकम, प्रहारचे नागनाथ खाटमोडे पाटील, ग्रमापंचायतीचे माजी सदस्य राजूशेठ कटारीया, विलास खाटमोडे, प्रगतशील शेतकरी आबासाहेब ठोंबरे, ग्रामपंचात सदस्य लक्ष्मण खैरे, दिवेगव्हणचे नितीन पाटील, नितीन नगरे, सद्दामभाई शेख, अनिल सोनवणे, महेश महामुनी, सलिमभाई शेख, बाळासाहेब गवळी, जावेदभाई शेख, पैंगंबर ताबोळी, महादेव ढवळे, राजसिंह पाटील, महादेव गुंजाळ, विजय गुळवे, राजू ठोंबरे, गणेश नगरे, निवास उगले आदींनी प्रवेश केला.
बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, तानाजी झोळ, सुजित बागल, सुहास गलांडे, पंचायत समितीचे सदस्य ॲड. राहुल सावंत, सुर्यकांत पाटील, धनंजय मोरे, उद्धव माळी आदी यावेळी उपस्थित होते.
