डिकसळ पुलाला निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे यांचा जनतेकडून सत्कार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पुणे ,नगर आणि सोलापूर या जिल्ह्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाला 55 कोटी रुपयांचा निधी हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घेतल्याबद्दल करमाळा माढा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांचा आज करमाळा येथील संपर्क कार्यालयात पश्चिम भागातील कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हा पूल मंजूर होण्यासाठी आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिकसळ पुलासाठी 55 कोटी रुपये निधी मंजूर केला असून या निधीतून जिल्हा हद्द ते कोंढार चिंचवली -खातगाव -पोमलवाडी प्र जि मा 3 ला जोडणारा रस्ता प्रजिमा 190 किमी मध्ये मोठा पूल बांधण्यात येणार आहे.हा पूल तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे .फक्त करमाळा नव्हे तर मराठवाड्यातून पुणे व मुंबईला जाणारी वाहने याच मार्गावरून जातात .याशिवाय ऊस वाहतुकीच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे यामुळे पुणे नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील दळणवळण प्रक्रिया सुलभ होऊन विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुहास गलांडे यांनी करून मामांनी हे काम केल्याबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.यावेळी बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे ,उद्धव माळी, आदिनाथचे संचालक किरण कवडे,महादेव नवले,सरपंच भरत खाटमोडे, अतुल खाटमोडे,तानाजी बापू झोळ,सरपंच दादासाहेब कोकरे,तानाजी बाबर,राष्ट्रवादी युवक चे लक्ष्मीकांत पाटील, डॉक्टर गोरख गुळवे, सुहास गलांडे, सूर्यकांत पाटील ,अशोक पाटील ,राजेंद्र बारकुंड ,राजेंद्र धांडे ,सतीश शेळके, नागनाथ लकडे, भिकाजी भोसले, रामदास गुंडगिरे, सुनील सावंत, भरत अवताडे, गणेश गुंडगिरे, बापू मोरे,सरपंच आशिष गायकवाड ,सरपंच उदय ढेरे,चाकणे मेजर,राजेंद्र बाबर ,सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष सरपंच डॉ अमोल दुरंदे, आर .आर बापू साखरे, संजय सारंगकर, नंदकुमार जगताप,मनोज शिंदे यांच्यासह करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.
