उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे अस्थिव्यंग दिव्यांग प्रमाणपत्राचे आ. संजयमामा शिंदे यांचे हस्ते वाटप
करमाळा प्रतिनिधी
आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून गुरुवार दि.23 डिसेंबर 2021 पासून अस्थिव्यंग(हाडाचे) दिव्यांग रुग्णांची तपासणी करून त्यांना नवीन प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे दिव्यांगांचे सोलापूर ला जाण्याचे हेलपाटे वाचले आहेत. उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दर गुरुवारी दिव्यांग असलेल्या रुग्णांची तपासणी होत असते .आतापर्यंत एकूण 12 रुग्णांची तपासणी उपजिल्हा रुग्णालयात झालेली आहे .
यामध्ये त्रिंबक साहेबराव शिंदे .जेऊर, दत्तू बापू काटोले.सौंदे ,संतोष रामचंद्र बदर. साडे,हरिदास मारुती चव्हाण.पारेवाडी,संतोष गुलाबराव नलवडे.कामोणे,राजेंद्र ज्ञानदेव शिंदे.पोथरे,सुरेश विठ्ठल नखाते .आळजापुर, या रुग्णांची तपासणी केलेली असून प्रातिनिधिक स्वरूपात आज अभिषेक तात्या कानगुडे .देवळाली, सारिका अनुराध नलवडे. कामोणे, बाळू तुकाराम पाखरे. उमरड ,बाळासाहेब सोपान काळे. जातेगाव यांना आमदार शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. महेश भोसले ,डॉ. स्मिता बंडगर, डॉ.अविनाश राऊत ,डॉ. राहुल कोळेकर ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे , उद्धवदादा माळी, तानाजी बापू झोळ, दत्ताभाऊ जाधव ,राजेंद्र पवार ,राजेंद्रकुमार बारकुंड, अनिल पवार आदी उपस्थित होते.
आ.संजयमामा शिंदे यांनी यावेळी सोलापूरचे सिव्हिल सर्जन यांच्याशी चर्चा करून डोळ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र करमाळा येथे देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या .तसेच तालुक्यातील गरोदर महिलांची सोनोग्राफी करण्यासाठी आपण आमदार निधीमधून सोनोग्राफी मशीन देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. PSA ऑक्सिजन निर्मिती प्लांट ,लिक्विड ऑक्सिजन प्लांट यांची त्यांनी पाहणी केली. तसेच कोविडचे रुग्ण वाढल्यास त्यांना आवश्यकतेनुसार गरज भासेल तसे ऑक्सीजन प्लांट सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.उपजिल्हा रुग्णालयसाठी मंजूर झालेले व प्रस्तावित असलेल्या 100 बेडची इमारत व कर्मचारी वसाहतसाठी आवश्यक असलेल्या इमारतीच्या जागेची पाहणी त्यांनी यावेळी केली.
