संजयमामा शिंदे मोटर वाहतूक संस्थेच्या अध्यक्षपदी बापूराव गायकवाड तर उपाध्यक्षपदी संभाजी नलवडे यांची बिनविरोध निवड
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील संजयमामा शिंदे मोटर वाहतुक संस्थेची सन 2021-22 ते 2026- 27 या कालावधीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा यांचे वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला होता. आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड होत असताना प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे संस्थेच्या अध्यक्षपदी बापूराव गायकवाड तर उपाध्यक्षपदी संभाजी नलवडे यांची निवड झाली असल्याची माहिती संजयमामा शिंदे मोटार वाहतूक संस्थेचे सचिव श्री सुजित बागल यांनी दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एन. माने यांनी काम पाहिले.
संस्थेमध्ये श्री ज्ञानदेव गणपती जगदाळे, नानासो सर्जेराव शिंदे, वैभव लालासो बागल, महादेव कैलास जाधव ,सुहास प्रताप बागल, आजिनाथ सुखदेव चव्हाण, वैशाली संभाजी बागल, हनुमंत दिलीप बागल , सुजित शिवाजी बागल यांची यापूर्वीच निवड झालेली आहे .संजयमामा शिंदे संस्थेच्यावतीने अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या वतीने दुष्काळामध्ये लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात आलेला होता. त्याचबरोबर जनावरांसाठी चारा छावनी, कोरोना कालावधीमध्ये सॅनिटायझर तसेच मास्क वाटप, अर्सनिक अल्बम गोळ्यांचे वाटप वृक्षारोपण कार्यक्रम ,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप कार्यक्रम आदी उपक्रम राबविले जातात.संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीप्रसंगी संस्थेचे संचालक ,अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांच्याबरोबरच गुळसडीचे युवा नेते मानसिंग भैय्या खंडागळे ,आ. संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर उपस्थित होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्याचे माजी आ. जयवंतराव जगताप तसेच विद्यमान आ. संजयमामा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
