Monday, May 5, 2025
Latest:
करमाळा

कर्नाटकमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता देशात सत्ता परिवर्तनाची सुरुवात प्रतापराव जगताप यांचे प्रतिपादन करमाळ्यात काँग्रेसच्यावतीने विजयाचा जल्लोष

करमाळा प्रतिनिधी देशात राज्यात सध्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काॅंग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने बदलाची सुरूवात कसब्यातुन सुरु झाली असुन‌ कर्नाटक राज्यात‌ काँग्रेसन एक हाती सत्ता मिळवली आहे येत्या 2024 ला काँग्रेस मित्र पक्षाचे सरकार केंद्रात येणार असल्याचे मत काँग्रेस करमाळ्याचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केले . कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसने एखादी सत्ता मिळून भाजपचा जोरदार पराभव केला आहे.कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशाबद्दल करमाळा काँग्रेस आयच्या वतीने फटाकेची आतिशबाजी करून एकमेकांना पेढे भरवत नागरिकांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप सरचिटणीस संभाजी शिंदे नितीन चोपडे गणेश फलफले नागेश राखुंडे यतीन माने,खलील बागवान, बबलू चिंचकर यांच्यासह कार्यकर्त पदाधिकारी उपस्थित होते.देशात सध्या भाजपाविषयी प्रचंड चीड आहे भाजप सरकार हे घोषणांचे सरकार असून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या लोटण्याचे काम या सरकारने केलेले आहे शेतकरी सर्वसामान्य जनता वाढती महागाई मराठा आरक्षणाचे प्रश्न ओबीसी वर्ग यांचे प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरे या सरकारकडे नाहीत त्यामुळे संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला वाढता जनाधार मिळत असून बदलाची वारी संपूर्ण देशभर पाहणार असल्याचे चित्र सध्या दिसत असून बदलाची सुरुवात कसबा पुणे येथून झाले असून याच्या 2024 आघाडीचे सरकार राज्यात तसेच केंद्रातही काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे चित्र सध्या कर्नाटक राज्यात मिळालेल्या यशामुळे दिसत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group