करमाळा शहरातील नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी कटीबध्द- सौ.स्वातीताई फंड
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील नागरिकांना नागरी सुविधा देण्यासाठी आपण कटीबध्द आहे असे मत करमाळा शहराच्या प्रभाग क्रंमाक तीनच्या नगरसेविका बांधकाम सभापती सौ स्वातीताई महादेव फंड यांनी व्यक्त केले.करमाळा शहरातील फंडगल्ली ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात आला आहे.या प्रभागातील नागरिकांना रस्ते,पाणी,वीज गटार याबरोबरच सर्व आरोग्यसुविधा सोयीसुविधा देण्यात आल्या असुन जनसेवा हिच ईश्वरसेवा मानुन काम केले असुन नागरिकांना सेवा देण्यास आपण कटिबध्द असल्याचे नगरसेविका सौ.स्वातीताई फंड यानी सागिंतले आहे.नगरसेविका सौ .स्वातीताई फंड यांनी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांचे हित जोपासुन सुविधा दिल्यामुळे नागरिकांतुन त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त जनतेचे नगरसेवक महादेव आण्णा फंड.नगरसेवक अतुल फंड उपस्थित होते.
