Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाकृषीसाखरउद्योग

अंबालिका साखर कारखान्याने उच्चांकी दर दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार शेतकरी परिसंवाद मेळावा संप्पन

करमाळा प्रतिनिधी वाशिंबे (ता.करमाळा) येथे ऊस उत्पादक शेतकरी व अंबालिका शुगर अधिकारी यांचा परिसंवाद मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम वाशिंबे चे सरपंच श्री नवनाथ बापू झोळ यांनी आयोजित केला होता यावेळी अंबालिका कारखान्याने उच्चांकी दर दिल्याबद्दल वाशिंबे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार सन्मान करण्यात आला.
शेतकरी संवाद साधत असताना चालू हंगाम यशस्वी करणे तसेच शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून वाढीव उत्पादन घ्यावे.वाढिव दरासाठी ८६०३२ जातीची लागवड करावी. माती परिक्षणांची कारखाना स्थळी सोय केली आहे. वाहतूकचे नियोजन संदर्भात श्री.जनरल मॅनेजर शिंदेसाहेब यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी अंबालिकाचे मुख्य संचालक जे.एन.वाघसो., संचालक भोसले,जनरल मॅनेजर शिंदेसाहेब, तावरे साहेब,शेतकी अधिकारी भोसले साहेब, गायकवाड नाना,अनिल झोळ साहेब,पागिरें सो.यवले सह कारखाना अधिकारी मा.सरपंच श्री.अनुरथ झोळ, प्रगतशिल बागायतदार जगदिश जगदाळे, भानुदास टापरे, भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार साळुंके, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा मगर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ,लालासो जाधव,तानाजी झोळ,कल्याण मगर,गजेंद्र झोळ,अमोल भोईटे,संदिप झोळ, अजित झोळ, सह शेतकरी,ऊस वाहतूकदार उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group