छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस आय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कोश्यारी त्रिवेदीचा निषेध
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस आय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मा.पोलिस निरीक्षक व मा.तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध करण्यात आला.
वास्तविक पहाता महाराष्ट्राचे राज्यपाल हे भा.ज.पा.चे कार्यकर्ते असल्यासारखे वावरत आहेत.आज पर्यंत राज्यपालांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीबा फुले,तसेच छत्रपती शिवाजी महाराजा विषयी चुकीचे वक्तव्य करीत आपल्या कंगाल बुद्धीचे प्रदर्शन केले आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रा सहीत देशभरातील शिव प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे म्हणाले की आज पर्यंत जे झाले ते झाले यानंतर जर परत कोणत्याही महापुरुषा बद्दल गैरशब्द काढला तर राज्यपालाचे धोतर फेडायलाही समस्त काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मागे पुढे पहाणार नाहीत.
यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे.त्यांच्या बद्दल चकारही अपशब्द बोलायची राज्यपाला सहीत कोणाचीच लायकी नाही.इथुन पुढे जर असे क्रृत्य पुन्हा घडल्यास अतिशय उग्र आंदोलन करण्यात येईल.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप व राष्ट्र्वादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली मा.पोलीस निरिक्षक व मा.तहशिलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे,
,अल्पसंख्यांक काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख, काँग्रेस आयचे ओबीसी विभागाचे ता.अध्यक्ष गफुरभाई शेख, काँग्रेस आयचे ता.सचिव संभाजी शिंदे ,राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे करमाळा शहराध्यक्ष रुषीकेश शिगची, काँग्रेस आय पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष रमजानभाई मुलाणी, रा.काँ.चे ता.उपाध्यक्ष समाधान शिंगटे,ता .सरचिटणीस रविराज घाडगे,काँग्रेस आयचे ता.सचिव जैनुदीन शेख,N.S.U.I.चे तालुकाध्यक्ष समाधान काळे, सुजय जगताप, संदीप झोळ,आरशान पठाण,गणेश फरातडे,अनिकेत फरतडे,समाधान सुपे,तानाजी फरतडे,अतुल मारकड,आनंद झोळ, हणुमंत पवार,शरीफ पठाण,अफजल पठाण,मुसा पठाण,अशोक शेळके,सुरज जाधव,नितीन चोपडे,निखिल गरड,संदेश माळवे,उपस्थित होते.यावेळी राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांच्या निषेधाच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमला होता.
