भारत देशाच्या 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. दुरंदे गुरुकुल,कोर्टी .या प्रशालेमध्ये मा.श्री. नीलकंठ अभंग यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ
कोर्टी प्रतिनिधी भारत देशाच्या 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान संचलित, डॉ. दुरंदे गुरुकुल,कोर्टी .या प्रशालेमध्ये मा.श्री. नीलकंठ अभंग, मा. कृषी अधिकारी, पंचायत समिती, करमाळा यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत स. 8 : 15 वा. संपन्न नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे, देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्ये तसेच मनोरे केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री .दादासाहेब दुरांदे सर, माजी सैनिक श्री.विठ्ठल मेढे,श्री. बाळासाहेब पारखे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. चारुशीला जाधव, सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक ,माता ,भगिनी ,ग्रामस्थ इ. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका शिंदे मॅडम यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्ताविका संस्थेचे सचिव श्री. दुरंदे सर यांनी केली. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व व्यक्तींचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या मुख्याध्यापिका चारुशीला जाधव मॅडम यांनी केले.
