जिल्हा परिषद शाळा राजुरी येथील विद्यार्थीनीना ग्रामपंचायतीच्यावतीने मोफत सायकलचे वाटप
करमाळा प्रतिनिधी सामाजिक बाधिंलकिच्या भावनेतुन विद्यार्थ्याना वाडी वस्तीवरुन शाळेत ये जा करण्यासाठी पायपिठ करावी लागत असल्याने मोठी गैरसोय होत होती या गोष्टीचा विचार करुन विद्यार्थ्याची गैरसोय दुर करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याना सायकल देण्याविषयी सांगितले यावर सरपंच डाॅ.अमोल दुरंदे यांनी राजुरी ग्रामप़ंचायतीच्यावतीने मोफत सायकल देण्याचा निर्णय घेऊन जिल्हा परिषद शाळा राजुरी येथील इयत्ता चौथीतील 12 विद्यार्थिनींना ग्रामपंचायत मार्फत मोफत सायकलचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी राजुरीचे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश जाधव ,ग्रामसेवक गलांडे भाऊसाहेब, संतोष शितोळे गुरुजी सोमनाथ पाटील तुळशीराम जगदाळे अंकुश सुरवसे आदिजण उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्यावतीने मोफत सायकल वाटप केल्याने सरपंच अमोल दुरंदे व ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
