यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम विज्ञान शाखेत कु. बैरागी तालुक्यात प्रथम
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा जि. सोलापूर या महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल आज जाहिर झाला. यामध्ये *कला शाखा 73.31 टक्के, वाणिज्य शाखा 95.34 टक्के व विज्ञान शाखा 94.50 टक्के* असा लागला असून कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक कु. स्नेहल भारत दुरगुडे (85.00%),द्वितीय क्रमांक श्री. अमन गुरुदास आरणे (81.50%) व तृतीय क्रमांक कु. चव्हाण सानिका संतोष (79.00%) तसेच वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक श्री. मित संदिप खिलोशिया (90.83%), द्वितीय क्रमांक कु. कदम अंकिता हिरामण (89.33%) व तृतीय क्रमांक श्री. कदम प्रताप संतोष (88.83%) तसेच विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक कु. बैरागी सोनल प्रकाश (92.00%), द्वितीय क्रमांक श्री. शिंदे शुभम सोमनाथ (82.83%) व तृतीय क्रमांक कु. कांबळे साक्षी पोपट (76.17%) *तसेच वाणिज्य शाखेतील श्री. मित संदीप खिलोशिया व कु. कदम अंकिता हिरामण हे दोन विद्यार्थी सहकार विषयामध्ये 97 गुण मिळवून व अकौंटन्सी विषयामध्ये श्री. मोहोळकर कुणाल अशोक 99 गुण मिळवून तसेच हिंदी विषयामध्ये श्री. कदम प्रताप संतोष 97 गुण मिळवून पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहे.* सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्थेचे सचिव श्री. विलासरावजी घुमरे (सर), अध्यक्ष प्राचार्य श्री. मिलींद फंड (सर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कॅप्टन उपप्राचार्य श्री. संभाजी किर्दाक, सहसचिव श्री. विक्रमसिंह सुर्यवंशी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दीक अभिनंदन केले.
