Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज स्वामी चिंचोली विद्यालयाचा बारावी सायन्स विभागाचा कॉमर्स विभागाचा शंभर टक्के निकाल

12 वर्ष 100 टक्के निकालाची परंपरा कायम

करमाळा प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या सीमेवरती निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेल्या दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज स्वामी चिंचोली या विद्यालयाचा इयत्ता बारावीचा सायन्स विभागाचा व कॉमर्स विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर यश संपादन केले आहे.
इयत्ता बारावी सायन्स मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे
1. राजनंदिनी सतीश पवार 87.05
2. स्नेहा महादेव जगताप. 84.50
3. नम्रता कल्याण घाडगे. 83.50

इयत्ता बारावी कॉमर्स मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे
1. अनिशा हरी काळे 73.33
2. वर्षा महादेव कडू. 73.00
3. ऐश्वर्या दत्तात्रय निंबाळकर. 72.67
बारावी बोर्ड परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ साहेब संस्थेचे उपाध्यक्ष श्री राणा दादा सूर्यवंशी साहेब संस्थेचे सचिवा प्रा. सौ.माया झोळ . संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विशाल बाबर यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना प्राचार्य सौ सिंधू यादव डायरेक्टर सौ नंदा ताटे ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री धर्मेंद्र धेंडे. माध्यमिक विभाग प्रमुख संगीता खाडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group