उजनीच्या केत्तुर – पोमलवाडी – खातगाव शिवारात बेकायदा वाळु ऊपसा , वाळु माफियांचे महसुल अधिकाऱ्यांशी संगनमत , कायदेशिर वाळु ऊपसा व्हावा या करीता जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार – ॲड .अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर , पोमलवाडी आणि खातगाव परिसरात भिमा नदीच्या पात्रातुन सध्या रात्रीचे वेळी बेसुमार वाळुचा ऊपसा होत असुन केत्तुर , पोमलवाडी व खातगाव येथील सरपंच यांनी याबाबत लेडी सिंघम तहसिलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांचेकडे माहिती सादर केलेली आहे . या परिसरात रात्री अपरात्री सदरचा वाळु उपसा व वाहतुक होत असुन स्थानिक तलाठी व मंडल अधिकारी यांचेशी संगनमताने हे बेकायदेशिर उत्खनन गेल्या दहा दिवसांपासून चालु आहे . सदरचे वाळु माफीया हे करमाळा पोलिस स्टेशन व तहसिल पासुन ते उपसा सेंटर पर्यंत आपले हस्तक उभे करून व ऑफीस मधील शिपाई अधिकारी यांचेशी संगनमत करून माहीती घेऊन सदरचे कृत्य करीत आहेत . याबाबतची सविस्तर माहिती वेगवेगळ्या ठिकाणावरून संकलित केलेली असुन .. यामुळे शासनाचा प्रचंड महसुल हे लोक बुडवित आहेत . या नदी पात्रातली असणारी प्रचंड वाळु कायदेशिर ठिकाणे निश्चित करून लिलाव पद्धतीने उत्खनन केल्यास शासनाला निधी मिळेलच व ज्यांना कायदेशिर ऊपसा करायचा आहे ते या प्रक्रियेतून ठेके घेतील असे न झाल्यास संपूर्ण भागात बेकायदा उत्खनन होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे भागातील सर्व सरपंच व जबाबदार सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन आपण जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना याबाबत निवेदन देणार असलेबाबतची माहिती केत्तुरचे माजी सरपंच ॲड अजित विघ्ने यांनी दिली आहे .
