करमाळा

करमाळा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रा. रामदास झोळ फाउंडेशन यांच्यावतीने रावगाव येथे पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करुन शुंभारभ

करमाळा प्रतिनिधी प्रा. रामदास झोळ फाउंडेशन”* च्या वतीने रावगाव ता. करमाळा येथे पाण्याच्या टँकरचे नियोजन. करण्यात आले अशी माहिती प्रा.रामदास फाऊडेंशनचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी दिली आहे. पावसाळा सुरू होऊन महिना होत आली तरी पाऊसाने दडी मारल्यामुळे सध्या पाण्याची टंचाई करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात जाणवत आहे..आवश्यक त्या ठिकाणी *”प्रा. रामदास झोळ फाउंडेशन”* व *स्वाभिमानी शेतकरी संघटना* यांच्या माध्यमातून पाण्याच्या टँकरचे नियोजन करण्यात आले आहे . तरी उद्यापासून, पाऊस पडेपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे मोफत पाण्याचा पुरवठा केला जाईल. अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आली आहे. याचा शुभारंभ ऊद्या दुपारी ०४:०० वा. रावगाव येथुन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रा. रामदास झोळ सर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, रामभाऊ शेळके आदी मान्यवर उपस्थित राहणार असुुन या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहेे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group