कृषीरत्न आनंद कोठडीया प्रगतशील शेतकरी किरण डोके यांनी करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र निर्माण करण्यासाठी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांची घेतली भेट
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यात केळी पिकासाठी पोषक असलेलं वातावरण व लागवड क्षेत्रात होत असलेली वाढ भविष्यातील उपलब्ध संधीचा विचार करता जिल्ह्यात शेलगाव ता करमाळा येथे केळी संशोधन केंद्र निर्माण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे . यासंबंधी मागणीचे निवेदन करमाळा तालुक्यातील कंदर येथील केळी निर्यातदार शेतकरी उद्यान पंडित किरण डोके व कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी नुकतीच राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांना भेटून केली आहे.
गेल्या वर्षी देशातून 1200 कंटेनर केळी परदेशात निर्यात झाली यापैकी 8500 कंटेनर एकट्या सोलापूर जिल्ह्यातून गेले होते जिल्ह्यात केळी पिकासाठी असलेले पोषक वातावरण व दरवर्षी क्षेत्रात उल्लेखनीय वाढ होत असल्याने भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत मात्र यासाठी या पिकासंदर्भात काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे यामध्ये जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र निर्माण करण्याची गरज आहे करमाळा तालुक्यात शेलगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत पंचावन्न एकर क्षेत्रामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. सध्या तालुक्यात जिल्ह्यात केळी पिकाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याने याठिकाणी केळी संशोधन केंद्र निर्माण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.या संशोधन केंद्राचा लाभ शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्यासाठी सध्या या पिकांमध्ये करपा, बंचीटॉप,पनामा,वायरस,थ्रीप्स आशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.यासाठी नवीन संशोधनाची गरज आहे.याशिवाय केळीच्या नवीन जाती, उपपदार्थ निर्मीती व प्रकिया यासंदर्भातही संशोधन होणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन याठिकाणी सुसज्ज अशा केळी संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून अनेक दिवसांपासून केली जात आहे. यासंदर्भात मागणीचे निवेदन नुकतेच शेतकऱ्यांच्या वतीने कृषी आयुक्तांना देण्यात आले आहे . कंदर ता करमाळा येथील केळी निर्यातदार शेतकरी किरण डोके व कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी सोलापुर जिल्ह्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र निर्माण करण्याची मागणीसाठी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांची भेट घेतली आहे.
