करमाळा नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात – माजी नगरसेविका सविता कांबळे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगर पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील नागरीक मैला मिश्रीत पाणी पिऊन आजारी पडले आहेत त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे निवेदन बागल गटाच्या माजी. नगरसेविका सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी जिल्हा अधिकारी यांना दिले आहे.
करमाळा शहरातील सिद्धार्थ नगर, कुंकू गल्ली, खडकपुरा या भागात टाकलेल्या पाईपलाईनचे मैलामिश्रित दुषित पाणी येथील नागरिकांना जुलाब व उलटी सारखे आजार होत आहेत,लहान मुले सतत आजारी पडत आहेत. तरी करमाळा नगरपालिकेने सिद्धार्थ नगर,कुंकू गल्ली,खडकपुरा या भागात नवीन पाईप लाईन टाकण्यात यावी, तरी नवीन पाईप लाईन न टाकल्यास नगरपालिकेसमोर सिद्धार्थ नगर,कुंकू गल्ली,खडकपुरा या भागातील महिलांना घेऊन उपोषण व भव्य असे निदर्शने करणार आहेत असे सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी निवेदन दिले आहे.
