रिपाई करमाळ्यातच्या वतीने मराठा आरक्षणासाठी जय भिम जय शिवराय आंदोलन नागेशजी कांबळे यांचे तहसीलदार यांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी-मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीविरोधात मराठा समाजाच्या आंदोलनास संपूर्ण आंबेडकरी समाजाचा पाठिंबा असून रिपाई च्या वतीने इथून पूढं जय भिम जय शिवराय आंदोलनाद्वारे मराठा समाजाच्या या लढाईत सक्रीय सहभाग असेल असे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेशजी कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तहसील कार्यालयास पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत हे निवेदन देण्यात आले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या लेटरहेडवर जय शिवराय असा उल्लेख करत त्याच धाग्याला धरून संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक सलोखा व मराठा समाजाचा घटनात्मक अधिकार मिळविण्यासाठी RPI(A) या आंदोलनाद्वारे सक्रीय सहभाग नोंदवेल असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले.मराठा महासंघाचे अरूण काका जगताप.नाना कांबळे.प्रफुल्ल दामोदरे.तालूका अध्यक्ष यशपाल कांबळे.नितीन दामोदरे.विजय वाघमारे.आबा बनसोडे.रोहन भोसले.रणजित कांबळे.कालिदास पवार आदि जण उपस्थित होते
