Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाकृषी

करमाळा बाजार समितीत उडीदाला विक्रमी भाव :  ८४०१ रु . उच्चांकी दर :- प्रा.शिवाजीराव बंडगर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा

करमाळा प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना उडीदाचे मोठे उत्पादन झाले आहे . त्यामुळे बाजार समितीत सध्या दररोज मोठ्या प्रमाणात आवक होत असून उडीदाला चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे . मंगळवारी बाजारात उडीदाचा दर किमान ५७००, सरासरी ७७०० तर कमाल दर ८४०१ रु . दर मिळाला . तर मंगळवारी २००० क्विंटल आवकेचे सौदे झाले .करमाळा बाजार समितीत शेतकऱ्यांचे मालाचे त्वरीत मापे, चोख वजन व २४ तासाच्या आत पट्टीमिळत असल्यामुळे व आसपासच्या बाजार समित्यापेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत विक्रीस आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रा . शिवाजीराव बंडगर  यांनी केले आहे . बाजार समिती मधे सौदे सुरु असताना सभापती प्रा.शिवाजी बंडगर, सदस्य मयूर दोशी, आनंद कुमार ढेरे , सचिव सुनील शिंदे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळणे साठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन व्यापार्‍यांना केले . यावेळी व्यापारी कन्हैयालाल देवी, अशोक दोशी, विक्रांत मंडलेचा, मदनदास देवी, विनोद देवी, परेशकुमार दोशी, मनोज पितळे, संतोष व्होरा, आशीष बोरा, सुनील मेहता, शरदकुमार शहा, प्रदीप लुणीया यांचेसह शेतकरी शहाजी हुलगे, महादेव हुलगे, प्रकाश कोळेकर, महादेव भंडारे, भाऊसाहेब काळे यांचेसह व्यापारी व शेतकरी उपस्थित. होते .                               या वर्षी  जून पासूनच निसर्गाने  केलेली  कृपा त्यामुळे  करमाळा तालुका तसेच इतर तालुक्यात झालेली  भरघोस  पेरणी,झालेले  विक्रमी  उत्पन्न, खरेदीदारांचा सकारात्मक  प्रतिसाद, संचालक  मंडळाचे योग्य  नियोजन ,कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य  , त्वरीत  मापे,चोख वजने  व तात्काळ पट्टी  यामुळे  राज्यात  विक्रमी विक्रमी  दर देत  असताना  अत्यानंद होत आहे *प्रा.शिवाजीराव बंडगर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group