करमाळा

काँग्रेस आय पक्षाचे N.S.U.i चे तालुकाप्रमुख सोमनाथ काळे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश*

करमाळा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे पोंधवडी चारीच्या पाहणी साठी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता काँग्रेस आय पक्षाचे N.S.U.i चे प्रमुख सोमनाथ काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचे नेतृत्व मान्य करत प्रवेश केला आहे,
यावेळी सोमनाथ काळे म्हणाले की केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे तसेच तालुक्यातील भाजपाचे नेतृत्व गणेश चिवटे यांच्या कामाला प्रभावित होऊन मी माझ्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे, भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजना गणेश भाऊंच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले,
यावेळी तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, माजी शहराध्यक्ष संजयअण्णा घोरपडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, नितीन झिंजाडे, जयंत काळे पाटील, आजिनाथ सुरवसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group