करमाळा

. स्व. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानकडून गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक मोफत बेड देण्याचा अभिनव उपक्रम लोकार्पण सोहळा संप्पन

करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरामध्ये स्व. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानच्या माध्यमातून आत्तापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले असून माणुसकीचा धर्म म्हणून रुण सेवा ही ईश्वर सेवा मानून अबाल वृद्धाना स्वर्गीय बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानतर्फे रुग्णांना मोफत आत्याधुनिक बेडसेवा उपलब्ध करून देण्याचा लोकांर्पण सोहळा सोमवार दिनांक आठ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा छत्रपती चौक येथे पत्रकार बांधव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कै. बाबूराव तात्या गायकवाड प्रतिष्ठाणच्या वतीन करमाळा शहर व तालुक्यातील गरजु रुग्णांसाठी मोफत बेड सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना तात्काळ बेडचे वाटप करण्यात आले. त्यामुळे करमाळ्यात पहिल्यांदाच सुरु झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 रुग्णांना दवाखान्यातुन घरी पाठवल्यानंतर तेथे चांगला बेड मिळत नाही. याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. नातेवाईक देखील चिंतेत असतात काहीजणांची बेड घेण्याची परिस्थिती नसते. हिच गरज ओळखून प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी करमाळ्यात ही सुविधा सुरु केली आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे सचिन काळे, पत्रकार विशाल घोलप पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त करुन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास पत्रकार नासिर कबीर अशोक मुरूमकर सचिन हिरडे संजय चौगुले नागेश चेंडगे जयंत दळवी माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, महादेव आण्णा फंड , मनसेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे शिवसेनेचे संजय शिंदे युवा सेना तालुका अध्यक्ष राहुल कानगुडे मा.नगरसेवक अतुल फंड सचिन घोलप मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप,शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कटारिया सतिश फंड,दुर्गेश राठोड गणेश कुकडे अजित यादव राहुल यादव संजय कट्टा दीपक पाटोळे अरुणकाका जगताप युवराज जगताप केतन इंदुरे प्रमोद भाग्यवंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group